Image Credit: Istock
जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
राग रुसवे विसरुन वाढवा नात्यातला गोडवा एकत्र येऊन साजरा करुयात सण गुढीपाडवाचा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पालवी चैत्राची अथांग स्नेहाची जपणूक परंपरेची, उंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची, संपन्नतेची, उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवासाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी नवं वर्षाच्या स्वागताची गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!
गुढी उभारुयात नववर्षाची नव्या आयुष्याची सुख समृद्धीची चांगल्या आरोग्याची उज्ज्वल भविष्याची गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा!
गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेची आपणांस व आपल्या परिवारास हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
